गँग्रीन काय आहे

रक्ताभिसरणामध्ये अडथळा येण्यामुळे किंवा जिवाणूंच्या संक्रमणामुळे शरीराच्या स्थानिक उतींचा मृत्यू किंवा त्या विरुपीत होणे अशी गँग्रीनची व्याख्या केली जाते. मधुमेह किंवा अथेरोस्क्लेरोसिसचा भाग म्हणून, पायाचे गँग्रीन एक प्रमुख वैद्यकीय समस्या बनली आहे. जेव्हा गँग्रीन होते तेव्हा, अवयव विच्छेदन करावे लागते.
अवयव विच्छेदन, ही एक सर्वात जुनी शस्त्रक्रियेची प्रक्रिया आहे, याचा संदर्भ सहसा शरीराच्या वरच्या किंवा खालच्या भागातील संपूर्ण किंवा आंशिक भाग – पाऊल/पाय, हाताचा पंजा/बाहू शस्त्रक्रियेने काढण्यासाठी दिला जातो. तथापि, जेव्हा सर्व प्रकारचे उपचार थकले की मगच अवयव विच्छेदन करावे. शिरांच्या आजारांमुळे मोठ्या प्रमाणावर अवयव विच्छेदन केले जाते.
रोहिणीमध्ये अवरोध निर्माण झाल्यामुळे अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. जेव्हा रोहिण्या अरुंद किंवा कडक होण्याची तीव्रता वाढते तेव्हा, गँग्रीन होते आणि केवळ अवयव विच्छेदन हा एकच पर्याय राहतो. कारण मधुमेहामुळे शिरांमध्ये अवरोध निर्माण होतो. 30 - 40 टक्के अवयव विच्छेदन मधुमेहींमध्ये होते. मधुमेहींमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारे अवयव विच्छेदन हे सर्वसाधारण जनतेहून 15 ते 40 टक्के जास्त असते.

अधिक जाणून घ्या

कॉपीराईट ©2018 गँग्रीन Treatment.in. सर्व हक्क राखीव.

वेबसाईट रचना 2 टेक ब्रदर्स